शेंदुर्णी प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी रस्त्यावर उतरून लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत कर्मचारी कलीम शेख, विलास जोहरे, राजकुमार बारी, मधुकर बारी, दिनेश कुमावत, सुनील निकम, सुनील मोची यांच्या पथकाने आज १ जून रोजी सकाळी शहरातील विविध अस्थापनांवर धडक कारवाई करत दंड वसुली केली. त्यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे, ग्राहकांची गर्दी, मास्कचा वापर न करणाऱ्यांवर ३ हजार १०० रूपयांचा दंड वसुल केला आहे. तसचे समाधान वडा पाव सेंटर, भागवत भोई याचे वडा पाव सेंटर यांच्या वडापाव गाड्या सुरू असल्याचे निदर्शनास आले. सागर कलेक्शन, अशोक क्लॉथ, पी.सी.ज्वेलर्स येथे मास्कचा वापर न करणे या कारणाने प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारणी करण्यात आली. याप्रमाणे एकूण ६ हजार १०० दंड वसुली केली. या आधीही प्लास्टिक बंदी, मास्क न वापरणाऱ्यांकडून दंडाची वसुली करण्यात आली असुन अवैधरित्या बाजार भरविल्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांकडूनही दंड वसूल करण्यात आला आहे.
याविषयी मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, दंडाची वसुली करणे हा या धडक मोहिमेचा उद्देश नसून मानवी जीवन अनमोल असुन नागरिकांनी कोरोना आपत्तीच्या काळात स्वतःसह कुटुंबाची, समाजाची काळजी घ्यावी, सोशियल डिस्टन्सचे नियम पाळावे, घराबाहेर विनाकारण पडू नये, आवश्यकता असल्यास घराबाहेर पडतांना मास्कचा नियमितपणे वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, या विषयावर जागरूकता व नागरिकांना शिस्त लावणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन अशी कारवाई करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी मास्क शिवाय रस्त्यावर फिरू नये व गर्दी जमवून सोशियल डिस्टन्सचे उल्लंघन करू नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा मुख्याधिकारी पिंजारी यांनी दिला आहे.