शेंदूर्णी प्रतिनिधी । शेंदूर्णी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी रात्री ९ वाजता घरातील लाईट बंद करून पणत्या लावायचे आवाहन केले होते. त्याला शेंदूर्णीकरांकडून ७० टक्के प्रतिसाद मिळाला. आपत्तीच्या काळात काही भागातील उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आतिषबाजी केली.
संचारबंदीच्या काळात काही भागात डीपीचे फ्यूज काढून पुर्ण लाईट बंद करण्याचा प्रकार घडल्याने गावातील सुज्ञ नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेंदूर्णी येथे नियोजित ९ वाजेच्या वेळे आधीच ७.४५ वाजता गेलेली लाईट ८.४५ वाजता आली. चौकशी केली असता सबस्टेशनवर मुख्य लाईन तार तुटली असल्याचे सांगण्यात आले. लाईन आल्यावर नगरपंचायतकडील दिवाबत्ती कर्मचारी हा कमल किसन नगर व स्टेशन भागातील स्ट्रीट लाईट बंद करीत असल्याचे निदर्शनास आले असता नागरिकांनी विरोध केला. म्हणून कर्मचारी स्ट्रीट लाईट बंद करू शकला नाही. नागरिकांनी स्ट्रीट लाईट बंद करण्याविषयी शासनाच्या ‘जीआर’ची मागणी कर्मचाऱ्यांना केली. याविषयी नगरपंचायत वरीष्ठ अधिकारी यांचेकडे फोनवरून तक्रार करण्यात आली. त्यांनी त्वरित दखल घेतली व गावातील स्ट्रीट लाईट बंद न करण्याविषयी ताकीद दिली होती.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००