शेंदुर्णी प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता तिसऱ्या टप्प्यात पोहचला असून देशभरात संसर्ग झालेल्या रुग्णाची संख्या वाढत आहे शहरांत व ग्रामीण भागातील विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी शेंदूर्णीतील सर्व राजकिय पक्ष संघटना, पत्रकार, व्यापारी आणि नागरिकांतर्फे वेशीपर्यंत आलेल्या कोरोनाला हरविण्यासाठी शहरवासीयांनी स्वयंस्फुर्तीने ३ दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी शेंदूर्णीतील सर्व राजकिय पक्ष व नागरीकांनी नगरपंचायत व पोलीस प्रशासनास देण्यात आले असून निवेदनात ३० एप्रिल ते २ मे २०२० असे तीन दिवस ३ दिवस १०० टक्के जनता कर्फ्यु पाळण्यात येणार असल्याचे संगीतले आहे. परंतु नगरपंचायतकडून यात बदल करण्यात आला आहे. कारण बुधवार रोजीचा बाजार पुर्णपणे बंद होता, नागरिकांना भाजीपाला व किराणा भरणाऱ्यांना किराणा भरता आला नाही. ३० रोजी नागरिकांना अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी संधी देण्यात आली. १ ते ३ मे २०२० तिन्ही दिवशी शासकीय सुट्टी असल्याने सर्व कार्यालय बंद राहतील. त्यामुळे जनता कर्फ्यु पाळण्यात अडचणी येणार नसल्याने असे तीन दिवस जनता कर्फ्यु राहणार असल्याचे नगरपंचायतीकडून कळविण्यात आले आहे. जनता कर्फ्यु दरम्यान डॉक्टर व मेडिकल सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहे. नागरिकांनी वरील तीन दिवशी कुठल्याही कारणाने घरा बाहेर पडू नये, विनाकारण फिरणाऱ्या व मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून ५००/- दंड वसूल करण्यात येणार आहे, तरी घरीच राहा व सुरक्षित रहा, असे आवाहन करण्यात आले आहे.