शेंदुर्णी -लाईवह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भगवान श्री त्रिविक्रम नगरी शेंदुर्णी येथे संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा साजरा होत आहे. त्या निमित्ताने बुधवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ५.३० वाजता श्री त्रिविक्रम महाराज मंदिर येथून प्रभात फेरी काढण्यात आली.
सकाळी ८.०० वाजता संतश्रेष्ठ श्री कडोजी महाराज मंदिर येथे संत श्री. नरहरी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व आरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी समाजातील महिला व पुरुषांनी श्री नरहरी महाराज यांचे पाद्य पूजन केले. तसेच सकाळी १० वाजता रामदास नथ्थूशेठ बाविस्कर यांच्या घरी (भवानी गल्ली) श्री सत्यनारायणाची महापूजा व तीर्थप्रसाद आयोजन करण्यात आले होते होते रात्री ८ वाजता श्री त्रिविक्रम महाराज मंदिर येथे हभप श्री कन्हैय्या महाराज शेंदूर्णी कर यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. कार्यक्रमाला भाविक भक्तांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन अखिल भारतीय अहिर सुवर्णकार समाज शेंदूर्णीतर्फे करण्यात आले आहे.