अमरावती (वृत्तसंस्था) क्षुल्लक वादातून मोठ्या भावानेच आपल्या लहान भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडली आहे. रामदास गोमासे (५५) असे मृतकाचे नाव असून राजाराम गोमासे (६५) असे हत्या केलेल्या सख्ख्या भावाचे नाव आहे.
मागील काही महिन्यापासून रामदास बडनेराच्या अकोला मार्गावरील हिंदू स्मशानभूमी परिसरात राहत होते. या दरम्यान या दोघांचा शुल्लक कारणावरुन वाद झाला आणि याच वादातून राजाराम याने रामदास यांच्या पोटात विळ्याने वार केल्याने गंभीर झालेल्या रामदास यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर राजाराम घटनास्थळावरुन पसार झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर काही वेळातच लुसीच्या मदतीने पोलिसांनी रामदास गोमासेला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असून आरोपी भावाला अटक करण्यात आली आहे.