जळगाव, प्रतिनिधी | रेल्वे बोर्ड पीएसी कमिटी उद्या दि. २४ जानेवारी रोजी भुसावळ व जळगाव येथे रेल्वेच्या कामाचे निरीक्षणासाठी येणार असून विकास कामांचा आढावा घेणार आहे.
भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत पीएसी कमिटी भुसावल रेल्वेस्थानक व जळगाव रेल्वेस्थानकाना शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी रेल्वे बोर्ड पीएसी कमिटी चेअरमन पी. के. कृष्णदास यांच्या नेतृत्वाखाली कमिटी येणार आहे. यात कमिटी सदस्य डॉ. राजेंद्र फडके, हिमाद्री बल, प्रेमानंद रेड्डी, रविंद्रनजी, डॉ. अजितकुमार, परशुराम महनतो, श्रीमती काकू विजयालक्षमी हे उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९ वाजता भुसावळ रेल्वेस्थानकचे निरीक्षण व विकास कामाचा आढावा घेतल्यानंतर जळगाव येथे दुपारनंतर रेल्वेस्थानकावर विकास कामे व प्रवाश्यांच्या समस्या कमिटी समजुन घेणार आहे.