जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर परिसरातील जे.के. जिनिंगमध्ये चोरट्यांनी उभ्या सहा ट्रकच्या कॅबिनमधून वायरी तोडून बॅटर्या लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. महिनाभरापासून चोरट्यांचा उच्छाद सुरु असून सात ते आठ बॅटर्या लंपास झाल्या आहेत. चोरीनंतर नवीन बॅटरी बसविताच चोरटे नवीन बॅटरी चोरुन नेत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ट्रकचालकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मालधक्का परिसरात उतरणार्या मालाची वाहतूक करण्याचे काम ट्रकचालक करीत असतात. काम आटोपल्यावर रात्री ट्रकचालक त्यांचे ट्रक हे रेल्वे पूलाजवळ असलेल्या जे.के.जिनिंगमध्ये उभे करत असतात. गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास जे.के. जिनिंगच्या मोकळ्या मैदानात नेहमीप्रमाणे हबिब रेहमान पटेल, लक्ष्मण महादेव पोळ, दिलीप विठ्ठल चौधरी तिघे रा. शिवाजीनगर यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे एम.एच.22 1764 , एम.एच. 19 3825, एम.एच. 19 झेड 6716, एम.एच. 19 झेड 2017, एम.एच. 19 झेड 1722 , 04 जी.सी. 2523, एम.एच. 04 एच. 9520, एम.एच.04 4632, एम.एच 19 झेड 5457, एम.एच. 19 झेड 3322 व एमडब्लूडी 7271, एम.एच.19 3004 या क्रमांकाचे उभे केले होते. शुक्रवारी सकाळी संबंधित ट्रकचे मालक मालवाहतुकीसाठी ट्रक घेण्यासाठी गेले असता, याठिकाणी हबिब पटेल यांच्या ट्रकसह लक्ष्मण पोळ, दिलीप चौधरी यांच्या ट्रकच्या कॅबिनचा दरवाजा तोडून ट्रकमधील बॅटर्या लांबविल्याचे समोर आले.
जे. के. जिनिंगमध्ये मध्ये वॉचमन आहे. या वॉचमनला आवाज आल्याने ते बाहेर आले. तीन ते चार जणांना त्यांनी आवाजही दिला. मात्र संबधितांनी वॉचमनला दगड फेकून मारले. यानंतर संबंधितांनी बॅटर लांबविल्यानंतर त्यातील पाणी फेकून दिले. व बॅटर्या घेवून पोबारा झाले. जे.के.जिनिंगच्या समोरील बाजूस एक पानटपरी आहे. या बाजूने भिंतीवरुन चोरटे आले. व याठिकाणाहूनच दुचाकीवरुन चोरटे परतल्याचा अंदाज ट्रकचालकांनी व्यक्त केला आहे. तसेच तीन ते चार जणांना रात्रीच्या वेळीच दुचाकीवरुन जातांना येथील नागरिकांनी बघितल्याचे ट्रकचालक म्हणाले.
गेल्या 20 दिवसांपूर्वी याच ठिकाणाहून युवासेना महानगरप्रमुख स्वप्निल अशोक परदेशी यांच्यासह मंजूर शेख यांच्या ट्रकमधून अशा एकूण तीन बॅटर्या चोरट्यांनी लांबविल्या होत्या. बॅटरी चोरी झाल्यानंतर मंजूर शेख यांनी नवीन बॅटरी बसविली. ही नवीन बॅटरीही चोरट्यांनी लांबविली आहे. याप्रकरणी तक्रारीसाठी स्वप्निल परदेशी, यांच्यासह हबिब पटेल, लक्ष्मण पोळ, दिलीप चौधरी व इतर ट्रकचालकांनी शहर पोलीस स्टेशन ठाणे गाठले. संबंधित प्रकाराबाबत तक्रार दिली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/404540224250744/