Home क्राईम शिवाजी नगरातील तरूण दोन दिवसांपासून बेपत्ता; शहर पोलीसात नोंद

शिवाजी नगरातील तरूण दोन दिवसांपासून बेपत्ता; शहर पोलीसात नोंद


जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरातील उमर कॉलनी परिसरातून २२ वर्षीय तरूण  घरात काहीही न सांगता दोन दिवसांपासून बेपत्ता झाला झाला. वडीलांच्या खबरीवरून आज मंगळवारी दुपारी शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्शद खान युसुफ खान पठाण (वय-२२) रा. उमर कॉलनी शिवाजी नगर हा तरूण आपल्या आई शमीमबी, वडील युसुफ खान गुलाब खान पठाण यांच्यासह राहतो. वडील खासगी मेडीकल कॉलेजमध्ये नोकरीला आहे. तर अर्शद  हा देखील मेडीकल कॉलेज मध्ये लिपीक म्हणून नोकरीला आहे. सोमवार २८ जून रोजी अर्शद ड्यूटीवर जावून येतो असे आई शमीमबी यांना सांगून सकाळी ९.३० वाजता घराबाहेर पडला. दुपारी त्याला जेवणासाठी वडीलांनी फोन केला. त्यावर थोड्यावेळात येतो असे सांगितले. परंतू रात्री उशीरापर्यंत अर्शद खान पठाण हा घरी परतला नाही. आई व वडीलांना त्यांचे मित्र व नातेवाईकांडे फोन लावून अर्शदबाबत विचारपूस केली परंतू त्यांची कोठेही माहिती मिळाली नाही. आज मंगळवारी वडील युसुफ खान गुलाब खान पठाण यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय झाल्टे करीत आहे. 


Protected Content

Play sound