जळगाव, प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर येथे भारतीय जनता पार्टी मंडळ क्रं. १ मध्ये आज डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिवसानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आज दि. 23 जून रोजी शिवाजीनगर मंडलात भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले व डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी महानगर सरचिटणीस महेश जोशी, विशाल त्रिपाठी, भगतसिंग सर, मंडळ अध्यक्ष रमेश जोगी, सरचिटणीस शांताराम गावडे, नगरसेवक राजेंद्र मराठे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश पुरोहित, महिला आघाडी अध्यक्ष ज्योती तिवारी, शंकराव परदेसी, जावरु सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते