जळगाव, प्रतिनिधी । कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज महानगर शिवसेनेतर्फे कर्नाटक सरकारचा जोरदार घोषणाबाजी करून धिक्कार करण्यात आला.
कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेकडून महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ विविध घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, जळगाव तालुका प्रमुख राजू चव्हाण, जळगाव पंचायत समिती सभापती नंदूलाल पाटील,पंचायत समिती सदस्य जनाआप्पा कोळी, शहर संघटक दिनेश जगताप, उपशहर प्रमुख गणेश गायकवाड, नितीन सपके, हेमंत महाजन, ईश्वर राजपूत, प्रकाश पाटील, जाकीर पठाण, मोहसीन खान, जब्बार शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा चौधरी, सरिता माळी, ज्योती शिवदे, चौधरी ताई आदी उपस्थित होते.
भाग-१
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1244735492541894/
भाग-२
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/635870350384024/