जळगाव, प्रतिनिधी । महापौर व उपमहापौर पदाची निवडणुक होवून महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. आज १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी मावळते उपमहापौर सुनिल खडके यांच्याकडून उपमहापौरपदाचा पदभार स्विकारला. शहरातील रखडलेल्या विकास कामांना गती देणार असल्याचे उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी सांगितले.
काल गुरूवार १८ मार्च रोजी उपमहापौर कुलभुषण पाटील हे ऑनलाईन निवडणुकीच्या वेळी मुंबईला होते. आज सकाळी मुंबईवरून आल्यानंतर महापालिकेत आपल्या पदाचा पदभार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील यांनी श्री.पाटील यांचा सत्कार केला. माजी उपमहापौर सुनिल खडके, नगरसेवक चेतन सनकत, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेवक नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे, नगरसेवक सचिन पाटील, नगरसेविका पती सुधीर पाटील, नगरसेविका पती कूंदन काळे हे भाजप बंडखोरी केलेल यावेळी उपस्थित होते. गजानन मालपूरे, सुनिल माळी, लाडवंजारी आदी यावेळी उपस्थित होते.
जळगाव शहरातील आमच्या प्रभागातील विकास कामे ठप्प झाली होती. अडीच वर्षाच्या काळात रस्त्यांसह इतर विकास कामे झालेली नाही. आगामी अडीच वर्षात भाजपमध्ये राहिलो तर होणार नाही. यामुळे आम्ही नऊ जणांनी एकत्र येत, भाजपमधून बाहेर पडून शिवसेनेला पाठींबा देण्याचा निर्णय हा शहराच्या विकास कामांसाठी घेतला. कोणत्याही प्रकारचा घोडे बाजार झालेला नाही, अशा नवनियुक्त उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी दिल्यात.
https://www.facebook.com/508992935887325/videos/351763392775930
https://www.facebook.com/508992935887325/videos/345003906914199