Home राजकीय शिवसेनेची मालकी कुणाकडे ? : आज महत्वाची सुनावणी

शिवसेनेची मालकी कुणाकडे ? : आज महत्वाची सुनावणी

0
25

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेच्या मालकीवरून उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाची आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी आहे.

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदार आणि १३ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील तत्कालीन उध्दव ठाकरे सरकार कोसळलं आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. यानंतर खरी शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटाची की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटाची? हा वाद निर्माण झाला. त्यासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या गटानं निवडणूक आयोगासमोर केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू असून त्यावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या बाजूने युक्तिवाद केला जात आहे.

या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात अतिशय महत्वाची सुनावणी होणार आहे. दोन्ही गटांतर्फे आपणच खरी शिवसेना असल्याचा युक्तीवाद यात करण्यात येणार असल्याची बाब उघड आहे. यामुळे यात नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound