जळगाव : प्रतिनिधी । क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शिवसेना जळगाव महानगर व साहस फाउंडेशन यांच्या वतीने शहरातील सफाई महिला कर्मचारी यांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सरिता कोल्हे यांनी महिलांना हळदी कुंकूवाच वाण व साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान केला कोरोना काळात शासकीय नोकरी म्हणून कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या महिलांचाही कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे , महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, महिला महानगरप्रमुख शोभा चौधरी, मंगला बारी, सरिता कोल्हे , अंकुश कोळी , उप महानगर प्रमुख नितीन सपके , प्रवीण पटेल, गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर , पूनम राजपूत, दीपक कुक्रेजा, शंतनू नारखेडे , ऍड अभिजित रंधे, संतोष पाटील , मोसीन शेख , वसीम खान, डॉ सुषमा चौधरी, सपना शर्मा , विजया पांडे, भारती काळे, शुभांगी बिऱ्हाड़े, नेहा जगताप , निलु इंगळे , नेहा जगताप, निलाक्षी साठे , सविता पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत सुरळकर यांनी केले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/518263859091196
=========================================================