शिवसेना बिहार विधानसभा निवडणूक लढविणार ‘या’ चिन्हांवर

 

मुंबई, वृत्तसंस्था । बिहार विधानसभा निवडणूक शिवसेना लढवत असून निवडणूक आयोगाने ‘बिस्कीट’ चिन्ह दिले होते. याबाबत नाराजी व्यक्त करत सेनेला शोभणारे चिन्ह मिळावे अशी मागणी केल्यानंतर मागणी मान्य करत आयोगाने चिन्ह बदलून दिले आहे.

शिवसेनेने  निवडणुकीचे चिन्ह बदलून द्यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली होती. ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह देण्यात यावे, असं सेनेनं निवडणूक आयोगाला सुचवले होतं. पण ही तीनही चिन्ह आधीच अन्य काही उमेदवारांनी आरक्षित केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किटा ऐवजी ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे निवडणूक चिन्ह बदलून दिल्याचे मंगळवारी कळवलं आहे.

निवडणूक आयोगाने बदलून दिलेल्या या नव्या चिन्हाला शिवसेनेची पसंती दर्शवली आहे. शिवसेनेची बिहार विधानसभा निवडणुकीत ५० जागा लढवण्याची तयारी आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूने आक्षेप घेतला होता.

Protected Content