जळगाव, प्रतिनिधी । शिवसेना जळगाव महानगरतर्फे प्रभाग क्र ५ मध्ये अल्प दरात सर्व शासकीय योजना शिबिराचे उद्घाटन जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
महानगरातील प्रभाग क्र ५ मध्ये शिवसेना विभागप्रमुख प्रशांत सुरळकर यांच्या पुढाकाराने अल्पदरात शासकीय योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे माजी महापौर विष्णू भंगाळे महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील महिला महानगर प्रमुख शोभा चौधरी, मंगला बारी, सरिता कोल्हे, निलु इंगळे, कडू चौधरी, दीपक मराठे, कुंदन चौधरी, नारायण चौधरी, भय्या ठाकूर, मुन्ना परदेशी, प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते. या शिबिरात आयुष्यमान भारत योजना, महात्मा ज्योतिबा फुले योजना, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रमयोगी मानधन योजना, मतदान कार्ड, पॅन कार्ड नूतनीकरण योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना, स्मार्ट आधार कार्ड योजना, जेष्ठ नागरिक कार्ड आदी योजनांचा लाभ सदर शिबीरात घेण्यात येणार आहे. या शिबिरात दिनांक ४ ते १० जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन विभाग प्रमुख प्रशांत सुरळकर यांनी केले आहे.