शिवजयंती निमित्त जळगावात दुचाकी रॅली

rally

जळगाव प्रतिनिधी । शिवजयंतीचे औचित्य साधून शहरात विविध उपक्रमांना प्रारंभ करण्यात आला असून या अनुषंगाने जळगावातून दुचाकी रॅली काढण्यात आली.

सार्वजनिक उत्सव समितीतर्फे सोमवारी दुपारी ४ वाजता काव्यरत्नावली चौकातून दुचाकी रॅली काढण्यात आली. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते दुचाकी रॅलीचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी महापौर भारती सोनवणे, महापालिका स्थायी समितीच्या सभापती अ‍ॅड, शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, मुकुंद सपकाळे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा मंगला पाटील यांची उपस्थिती होती. रॅलीला काव्यरत्नावली चौकातून सुरूवात झाल्यानंतर सागर पार्क, आकाशवाणी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, बस स्टँड चौक, स्टेडियम, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रॅलीची सांगता झाली. रॅली दरम्यान महापौर भारती सोनवणे यांच्या घराजवळ महिलांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

Protected Content