जळगाव प्रतिनिधी । शिवकॉलनीत कमी दाबाने व रात्रीत होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी चालू असलेल्या अंतिम कामाची पाहणी करण्यात आली. नागरिकांची होणारी गैरसोय आता थांबणार आहे. उद्या पाणीपुरवठयाची चाचणी घेण्यात येणार असल्याचे अभियंत्यांनी सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक कैलास सोनवणे, माजी नगरसेवक मनोज काळे, प्रभाग समिती सदस्य रवींद्र नेरपगारे, भांडारकर, आशिषसिह हाडा, अभियंता जावळे व्हॉलमन राजू कांबळे व अमृत योजनेचे अधिकारी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती. दरम्यान कित्येक वर्षांपासून रात्री येणाऱ्या पाण्याचा त्रास असलेल्या नागरिकांना आता त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.येत्या २१ ता. रविवार रोजी दुपारी २ वाजता पाइपलाईनची चाचणी (ट्रायल) होणार आहे.परिसरातील पूर्ण भागात रात्री दहाच्यानंतर नागरिकांना जागे राहून पाणी भरावे लागत होते ,त्यापासून आता मुक्तता मिळणार आहे. या कामी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे हे स्वतः या ठिकाणी येऊन व थांबून कामाची वेळोवेळी पाहणी करत होते. यासाठी स्थानिक नगरसेवक व प्रभाग समिती सदस्य यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे यास यश आले आहे.