जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील 19 वर्षीय तरूणीने घरात कोणीही नसतांना दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान मुलीने गळफास घेतला नसून संशयास्पद मृत्यू असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, कोमल दिपक बिऱ्हाडे रा. आसोदा जि.जळगाव ह.मु. शिरसोली ही आपल्या आई संगिता बिऱ्हाडे आणि वडील दिपक बिऱ्हाडे आणि 5 वर्षाचा भाऊ सह शिरसोली येथे राहतात. आज दुपारी 12 वाजता संगिता बिऱ्हाडे ह्या बहिणीकडे भुसावळला गेल्या होत्या तर दिपक बिऱ्हाडे हे पेंटींगच्या कामासाठी कामावर गेले होते. घरात कोणाही नसतांना कोमल बिऱ्हाडे हिने 3 ते 3.30 वाजेच्या दरम्यान दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यावेळी घराचे दरवाजे उघडेच होते. लहान मुले पाणी पिण्यासाठी घरात गेले असता हा प्रकार उघडकीस आला. कोमलने आत्महत्या केल्याचे संगिताबाईचे वडील तथा आजोबा उत्तम काशिनाथ निकम यांनी धाव घेवून कोमलला खासगी वाहनाने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. दरम्यान मुलीने आत्महत्या केली नसून संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोपी आजोबा उत्तम निकम यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
मयत कोमल ही आयटीआय करून बारावीचे बाहेरून शिक्षण घेत होती. सोबत आईला आर्थीक मदत व्हावी म्हणून गावातील एका दवाखान्यात लॅब असिस्टन्स म्हणून काम करत होती. मुलीने आत्महत्या केल्याची माहिती आई संगिताला मिळताच जिल्हा रूग्णालयात हंबरडा फोडला. यावेळी नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती. एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.