पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोदे येथील एका शेतकऱ्याची ३ लाख ५० रुपये किंमतीची ट्रॅक्टर व ट्रॉली चोरून नेल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली आहे.
याबाबत शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा करण्यात आला आहे. शेतकरी समाधान शंकर पाटील राहणार शिरसोदे यांनी गावालगत आपल्या काकाच्या शेडमध्ये १९ फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास ट्रकटर (एमएच १९, १२३६) ट्रॉली सोडली. त्याच दिवशी रात्री १० वाजेच्या सुमारास ते गुरांना चारा पाणी करण्यासाठी तेथे गेले असता ट्रॅक्टर व ट्रॉली ते दोघे जागेवर मिळून आले नाहीत. त्यांनी शोधाशोध केली असता त्याचा ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान गावातील एक व्यक्ती व जानवे तालुका अमळनेर येथील एक जण अश्या दोन व्यक्तींनी हे ट्रॅक्टर व ट्रॉली चोरुन नेल्याचा संशय त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केला आहे. याबाबत पोलिस ठाण्यात साडेतीन लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहे.