यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील शिरसाड येथील सरपंच यांच्या खळ्यातून ट्यूबवेल आणि पाईप असा एकूण ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरसाड गावातील सरपंच दीपक वामन इंगळे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती काम करून आपला ते उदरनिर्वाह करतात. त्यांचे गावाच्या बाहेर असलेल्या खळ्यात शेतीचे सामान ठेवतात. शेतात लागणारे सामान पाईप असा मुद्देमाल ठेवतात. १ जून ते ३० जुलै खळ्यातून गजानन भगवान अलकारी रा. शिरसाड ता.यावल याने ३० हजार रुपये किमतीचे ट्यूबवेल आणि गेसींग पाईप असा एकूण मुद्देमाल चोरून नेला. या प्रकारणी दीपक इंगळे यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवार २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता संशयित आरोपी गजानन भगवान अलकारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सिकंदर तडवी करीत आहे.