मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शिक्षणसेवकांसाठी महत्वाची घोषणा केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे. यानुसार अर्थसंकल्पात शिक्षणसेवकांच्या मानधनात सरासरी दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवकांचं मानधन ६००० वरुन १६,००० रुपये करण्यात आले आहे. तर माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात ८००० वरुन १८,००० रुपये करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचं मानधन ९००० वरुन २०,००० रुपये करण्यात आले आहे. त्याशिवाय पीएमश्री ८१६ शाळांना ५ वर्षांत १५३४ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.