जळगाव प्रतिनिधी । आश्रम शाळेत शिक्षक असलेल्या दिराने सख्या वहिनीवर बलात्कार केल्याची तक्रार बुधवारी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल झाली आहे. पीडीत विवाहिता रुग्णालयात दाखल आहे. शेतात काम करीत असताना १५ जून रोजी सकाळी दीराने आपल्यावर बलात्कार केला असे विवाहितेचे म्हणणे आहे. जळगाव तालुक्यातील एका गावात हा प्रकार घडला. याच प्रकरणाशी संबंधित एक गुन्हा सोमवारी एमआयडीसी पोलिसात दाखल आहे. त्यात बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी असलेला शिक्षक फिर्यादी आहे. तर शिक्षकाचा मोठा भाऊ, वहिनी व पुतण्या आरोपी आहे. मोठ्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे तर वहिनी रुग्णालयात दाखल आहे. तेथे या महिलेने शिक्षक असलेल्या दिराने बलात्कार केल्याची तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक सुनंदा पाटील यांनी पीडीत विवाहितेची फिर्याद घेतली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक विशाल वाठोरे करीत आहे.
शिक्षक असलेल्या दिराकडून वहिनीवर बलात्कार
5 years ago
No Comments