शिक्षक अतिरिक्त दर्शविण्यासाठीच जिल्ह्यात पाऊणे दोन लाख विद्यार्थी बोगस असल्याचे षडयंत्र : प्रविण जाधव यांचा आरोप

जळगाव, -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारने तांत्रिक अडचणी समजून न घेता केवळ माध्यमिक शाळा विद्यालयातील शिक्षकांवर कुऱ्हाड आणणेसाठी जळगांव जिल्ह्यात पावणे दोन लाख तर राज्यात १९ लाख विद्यार्थी बोगस / बनावट असल्याचा दावा राज्याच्या शिक्षण विभागाने केला असल्याचा आरोप भाजपा शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रविण जाधव यांनी केला आहे.

 

जिल्ह्यासह राज्यात बहुतांश शाळांमध्ये तांत्रिक अडचणीमुळे, वा संसर्ग काळात शाळा बंदच असल्यामुळे सत्तर टक्के मुलांचे आधार कार्ड अपडेट झालेले नाहीत. परिणामी हजेरी पटावरील विद्यार्थी संख्येत तफावत आहे. या तांत्रिक कारणामुळे बनावट वा बोगस म्हणून विद्यार्थी संख्या आकडेवारी फुगलेली दिसून येत आहे. विद्यार्थी संख्या जास्त आहे म्हणून कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवून सेवेतून काढण्यासाठी एक षडयंत्र आहे. यामुळे सरकारचा हा अन्याय सहन केला जाणार नाही.

शाळा प्रशासनाची चौकशी करण्याची मागणी
जळगांव शहरातील ओरीऑन इंग्लिश मेडियम या शाळेत मुलांची कोविड काळात काही फी थकीत असल्याकरण्याने त्या मुलांना वार्षिक परीक्षेला बसू दिले नाही म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून परीक्षेपासून वंचित ठेवणे हा किती भयंकर प्रकार आहे. संबधित शाळा प्रशासनाची चौकशी करण्याची आम्ही या निवेदनातून मागणी करत असून, शाळा प्रशासनावर त्वरित कारवाई करण्यात यावी अन्यथा, पालकांसमवेत आम्ही उपोषणाला बसणार असून शिक्षकांवर अतिरिक्तचा किंवा विद्यार्थांवर परीक्षेला बसू न देण्याचा अन्याय सहन करणार नाही. शिक्षण विभागाने यात त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जाधव म. जळगाव यांनी राज्याच्या शिक्षण सचिवांकडे केली आहे.

Protected Content