जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहू नगर परिसरात कॉम्लेक्सजवळ सट्टा जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर शहर पोलीसांनी कारवाई करत दोन जणांना रंगेहात पकडले आहे. त्यांच्या ताब्यातील जुगार खेळण्याचे साहित्य व १ हजार रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील शाहू नगर येथील शाहू कॉम्लेक्स दुकानाजवळ सट्टा जुगार खेळत असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरूण निकम यांच्या सुचनेनुसार पोलीसांनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कारवाई करत संशयित आरोपी मोबिन शेख झुलफिकार (वय-२५) रा. शाहु नगर आणि जुबेश हमिद खाटीक (वय-३२) रा. भिस्ती मोहल्ला, शाहु नगर यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील जुगार खेळण्याचे साहित्य आणि १ हजार २० रूपये रोख हस्तगत करण्यात आले आहे. पो.कॉ. रतन गिते यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यांनी केल कारवाई
पोलीस निरीक्षक अरूण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय निकुंभ, पो.का. तेजस मराठे, पो.का. युनूस तडवी, रतन गिते यांनी कारवाई केली असून पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे.