कराची (वृत्तसंस्था) पाकिस्तानच माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे.
शाहीद आफ्रिदीने लिहिलंय की,’गुरुवारपासून माझी तब्येत बिघडली होती. माझे शरीर प्रचंड दुखत होते. त्यानंतर मी वैद्यकिय चाचणी केली आणि त्यात कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मला आता तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आफ्रिदी अनेक गरजूंना सातत्याने मदत करत आहे. यापूर्वी, पाकिस्तानचा माजी सलामीवीर तौफीक उमर यालाही कोरोनाची लागण झाली होती.