Home Cities चोपडा शासकीय वाहनांवर मोफत सेवा देण्याचा चालक भगवान कोळी यांचा मानस

शासकीय वाहनांवर मोफत सेवा देण्याचा चालक भगवान कोळी यांचा मानस

0
25

चोपडा, प्रतिनिधी । येथील एस. टी. महामंडळाच्या आगारात चालक म्हणून कार्यरत असलेले भगवान महारु कोळी यांनी एस. टी महामंडळाची सेवा बंद असल्याने आपत्कालीन सेवा देत असलेल्या शासकीय वाहनावर चालक म्हणून नेमणूक मिळावी अशी विनंती केली आहे.

कोरोनाचे संकट देशावर असतांना आपल्या हातून देश सेवा घडावी अशी तळमळ असलेले चोपडा आगाराचे चालक भगवान कोळी यांनी एस. टी. महामंडळाची बस सेवा बंद असल्याने त्यांनी आपली सेवा शासकीय वाहनांवर जसे ऍम्ब्युलन्स, पोलीस वाहन, आर. टी. ओ. वाहन आदींवर मोफत देण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यांनी या संदर्भात आमदार लताताई सोनवणे, चोपडा आगार व्यापस्थापक, चोपडा तहसीलदार यांना पत्राद्वारे कळविले आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound