शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाच्या संचालकपदी अॅड. बाळकृष्ण पाटील यांची निवड

 

चोपडा, प्रतिनिधी । शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाच्या राज्याच्या कार्यकारिणीत संचालक म्हणून जळगाव जिल्ह्यातून अॅड. बाळकृष्ण पौलाद पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना व कृषी पत्रकारांना शासनाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. राज्यातील अशा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन “शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी संघ ,महाराष्ट्र राज्य ” स्थापन केला असून या संघाच्या राज्याच्या कार्यकारिणीत संचालक म्हणून जळगाव जिल्ह्यातून अॅड. बाळकृष्ण पौलाद पाटील (पत्रकार, दैनिक सकाळ ) यांची निवड झाली आहे. ह्यामुळे त्यांना राज्यपातळीवर कृषी व कृषीपूरक अशा व्यवसाय संदर्भातील काम करण्याची संधी मिळणार आहे. या संघावर निवड झालेले ग्रामीण भागातील जळगाव जिल्ह्यातील पाहिले पत्रकार आहेत. या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Protected Content