शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी सावखेडेसिम ग्रामपंचायतचे पाच सदस्य अपात्र

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सावखेडे सिम येथील  ग्रामपंचायतीच्या ६ सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केले असून त्यांना अपात्र करण्यात यावे, अशी तक्रार सलीम मुसा तडवी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दखल केली होती. याप्रकरणी सुनावणीअंती ५ ग्रा.पं.सदस्यांनी अतिक्रमण केल्याचे सिध्द झाल्याने महसूल उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी या पाचही सदस्यांना ग्रा.प.सदस्य म्हणून अपात्र असल्याचे घोषित केले आहे. तर एक सदस्याचे अतिक्रमण सिध्द न झाल्याने एका सदस्याची अपात्रता टळली आहे.

 

यावल तालूक्यातील सावखेडेसीम ग्रामपंचायतीच्या १३ सदस्य आहेत. त्यापैकी १ महिला सदस्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी ग्रा.प.सदस्यत्व सोडून अंगणवाडी सेविकेची नोकरी स्वीकारली आहे. त्यामुळे सावखेडा सीम ग्रा.पं.त सध्यस्थितीत १२ सदस्य असून त्यापैकी ६ सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर सिकंदर तडवी, मुस्तुफा तडवी, साधना तडवी, नबाब महेमूद तडवी, अलिशान सलीम तडवी, व मुबारक सुभेदार तडवी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. यात ग्रामपंचायत सदस्य मुस्तुफा रमजान तडवी, सिकंदर इब्राहिम तडवी, साधना अकबर तडवी व त्यांच्या कुटुंबियांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार करीत त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे अशी तक्रार स्थानिक नागरिक ताहेर लतीब तडवी, सलीम मुसा तडवी यांनी करित या सदस्यांना अपात्र घोषित करण्यात यावे अशी मागणी केली होती. या विवादाची सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यासुनावणी दरम्यान सिकंदर तडवी, मुस्तुफा तडवी, साधना तडवी, नबाब महेमूद तडवी, अलिशान सलीम तडवी, मुबारक सुभेदार तडवी या सदस्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदापासून अपात्र असल्याचा निर्णय उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी दिला आहे. तर एक सदस्य मुबारक तडवी यांनी अतिक्रमण केले असल्याचे सिध्द न झाल्यामुळे त्यांना अपात्रतेच्या कारवाईपासून अभय मिळाले आहे.
दरम्यान या सदस्यांविरोधात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल वेळीच हरकत घेण्यात आली होती, परंतू संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यावेळी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. एकूण तेरा सदस्यांच्या सौखेडा सिम ग्राम पंचायतमध्ये आता केवळ सात सदस्य उरले आहेत. यासंदर्भात अतिक्रमणप्रश्नी जिल्हाधिकारी स्तरावरून अपात्र झालेले सर्व ग्राम पंचायत सदस्य हे या निर्णयाच्या विरूद्ध अपीलात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Protected Content