मुक्ताईनगर प्रतिनिधी । कोविड-19 च्या संसर्गामुळे सध्याची परिस्थिती पाहता सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे किंवा परीक्षा शुल्कात ५० टक्के त्यात सूट देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनतर्फे करण्यात आली होती. यानुसार झालेल्या बैठकीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचाऱ्यांनी परीक्षा शुल्कात २५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यास खूप त्रासाला सामोरे जावे लागत होते. सध्याची कोविड-19 ची परिस्थिती पाहता इतके परीक्षा शुल्क भरणे विद्यार्थ्यांना शक्य नाही. सर्व विद्यार्थ्यांची मागणी होती की, त्वरित परीक्षा शुल्क माफ करा अन्यथा त्यामध्ये ५० टक्के सूट द्या. जिल्हा सचिव रोहित काळे यांनी वेबसाईटवर प्रश्न टाकल्यावर आपोआप चेक होऊन फक्त निकाल जाहीर करणे इतकी सोपी पद्धती तयार झाली आहे. अतिरिक्त होणारा खर्च वगळून आपण आमची परीक्षा फी ही ५०% करावी ही विनंती करण्यात आली होती. तसेच परीक्षा फी भरल्यावर विद्यार्थ्याला नेटचा ही खर्च करावा लागतोच हा ही विचार करावा म्हणून विद्यार्थ्यांची परीक्षा फी ही अर्धी करावी किंवा सरसकट माफच करावी अशी विनंती महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जिल्हा सचिव व प्रतिनिधी रोहित काळे आणि सोबत जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांनी प्राचार्य यांच्याकळे केली होती. कारण कोरोनाचा महामारीत विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ही खराब असून याचा विचार करावा असे देखील रोहन महाजन यांनी प्राचार्य यांना सांगितले सदरची परिस्थिती पाहता वालचंद सांगलीमध्ये जूनमध्ये होण्याऱ्या परीक्षेचे शुल्क माफ करण्यात आले आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद , शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे देखील परीक्षा शुल्कमध्ये सूट देण्यात आली आहे तरी विद्यार्थ्यांची मागणी आहे की परीक्षा शुल्क माफ करावे आणि महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन चे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा सचिव यांनी पत्राद्वारे प्राचार्य महोदयांकळे सोमवारी सकाळी केली असता त्यांच्याशी दूरध्वनीवरून वरून चर्चा सुध्दा केली.
लगेचच ३ तासाच्या आत प्राचार्य १२ वाजता बैठक बोलवत २५ % टक्के परीक्षा शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला असून सध्या विद्यार्थ्यांना थोडा का होईना दिलासा या निर्णयाने मिळाला आहे.
सध्या २५% चा निर्णय झाला आहे प्राचार्य यांनी परीक्षा फी ५०% कमी करण्याची भूमिका दर्शवली ,पण काही प्राध्यापक लोकांचे बोलणे झाले की सध्या २५ चा निर्णय घेऊ आणि लागत असलेल्या खर्चाचा विचार करून ५०% चा निर्णय हा पुढे घेण्याचा विचार असल्याचा प्रभारी प्राचार्य डॉ. देवेंद्र चौधरी यांनी सांगितले.