भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरातील शाळांमधे स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत भडगाव नगरपरीषदेच्या वतीने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यात विजेत्या स्पर्धकांना ट्राॅफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
भडगाव नगरपरीषदेच्या वतीने शहरातील सु.गी.पाटील विद्यालय, लाडकुबाई विद्या मंदिर, न्यु.इंग्लिश मेडिअम स्कूल व डाॅ.पुनम पवार माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्याना स्वच्छतेचे महत्व पटावे म्हणुन निबंध, चित्रकला, विज्ञान प्रदर्शन व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यातुन प्रत्येक स्पर्धेत पहील्या तिन विद्यार्थ्याना ट्राॅफी तर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
नुकतेच विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांच्या हस्ते बक्षिस वितरीत करण्यात आले. सु.गी.पाटील विद्यालयाच्या कार्यक्रमात उपप्राचार्य के.एस.पाटील, पर्यवेक्षक एस.एम.पाटील, पालिकेचे स्वच्छतादूत प्रा.डाॅ.दिनेश तांदळे, आरोग्य निरीक्षक तुषार नकवाल, छोटु वैद्य उपस्थती होते. तर न्यू इंग्लिश मेडिअम स्कूल येथील कार्यक्रमात मुख्याधिकारी रवींद्र लांडे, प्राचार्य विद्या पवार, समन्वय सुरेश गुजेला, स्वच्छतादूत प्रा.डाॅ.दिनेश तांदळे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी मनोगतातून विद्यार्थ्याना आपल्या शाळेबरोबरच घर ही स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.