जळगाव प्रतिनिधी । शहरात डेंग्यू , मलेरिया सारखे आजार अस्वच्छतेमुळे वाढत आहे. याचा परिणाम लहान मुलांवर होत आहे. शहरातील आरोग्य यंत्रणेसह स्वच्छतेच्या कामाला गती द्या अन्यथा लवकर सेवानिवृत्ती घ्यावी व जळगावकरांना मोकळे करावे अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने आज शुक्रवारी २४ सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्ता सतिष कुळकर्णी यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरात डेंग्य व मलेरियाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेने शहरातील आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लावणे गरजेचे आहे. आधीच आपण कोरोंना सारख्या महाभयंकर आजारातून नुकतेच बाहेर पडत आहोत. कोरोणामुळे बऱ्याच लोकांनी आपले आत्पेष्ट नातेवाईक गमावले या करणामुळे सगळ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे तशाच डेंगू आणि मलेरिया सारख्या आजाराने नागरीक हैराण झाले आहे. जळगाव शहरात स्वच्छतेचे तीन तेरा झाले आहे. महापालिकेचे सफाई कर्मचारी हजेरी पटावर सह्या करून पंधरा ते वीस दिवसांचा त्यांना पगार दिला जातो. याकडे ठेकेदार वाटरग्रेस कंपनीला ७५ कोटी रूपयांचा स्वच्छतेचा ठेका दिला आहे तरी स्वच्छतेकडे कंपनीचे साफ दुर्लक्ष दिले जात आहे.
वाटरग्रेसवर दंड आकारू नये यासाठी अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारात सहभागी करून जळगावकरांना वेठीस धरले आहे. अधिकारी किंवा उपायुक्त रस्त्यावर उतरून साधी चौकशीदेखील केली जात नाही. त्यामुळे वार्डावार्डात रोजची सफाई होत नाही. कोणतेही तपासणी मनपा अधिकारी करत नाही हे सर्वच न करण्यासाठी व त्यांना मनपा एवढाच पगार वॉटर ग्रेस कंपनीकडून दिला जात आहे. हे जळगावकरांसाठी घातक आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त म्हणून तुमच्याकडून आरोग्य यंत्रणा कार्यान्वित होत नसेल तर लवकर सेवानिवृत्ती घ्यावी व जळगावकरांना मोकळे करावे अशी मागणी निवेदनात केली आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्षा डॉ. आश्विनी देशमुख, कार्याध्यक्ष मनोज वाणी, समन्वयक मुविकोराज कोल्हे, अशोक लाडवंजारी, जुबेर खाटील, माजी नगरसेवक राजू मोरे, राकेश पाटील, जितेंद्र चांगरे, मंगला पाटील, किरण राजपूत, मिलींद सोनवणे, प्रविण महाजन, यशवंत पाटील, जुगल जैन आदि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.