जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील नेहमीच वर्दळीचा असणाऱ्या परिसरातील नो पार्किंग झोनमध्ये उभ्या असणाऱ्या दुचाकी वाहनांवर जप्तीची तर चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग व शहर वाहतूक शाखेतर्फे संयुक्तपणे करण्यात आली.
शहरात वाहतूकीस अडथळा नो पार्किंग झोनमध्ये उभ्या वाहनांवर जप्ती तसेच दंडात्मक कारवाई करण्यात आली. आज १२ दुचाकी वाहने जप्त करण्यात आलेत. यात कोर्ट चौक, टाॅवर चौक ते भिलपुरा चौक तसेच शनिपेठ पोलीस स्टेशन ते सुभाष चौक येथील नो पार्किंग झोनमध्ये उभ्या असणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण निर्मुलन विभागाने जप्त केलेल्या दुचाकी शहर वाहतूक पोलीस शाखेत जमा केल्या. ही कारवाई सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत तसेच दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत करण्यात आली. सकाळच्या सत्रात ५ तर सायंकाळच्या सत्रात ७ अशा एकूण १२ वाहने जप्त करण्यात आले. हे सर्व जप्त वाहने शहर वाहतूक शाखेत अतिक्रमण विभागाच्या ट्रॅकक्टरच्या सहाय्याने नेण्यात आली. ही कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख संजय ठाकूर, सतीश ठाकरे, नाना कोळी, संजय हरी पाटील, नितीन भालेराव, किशोर सोनवणे, शेखर ठाकूर, दीपक कोळी आदींच्या पथकाने केली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/783024676406961