जळगाव, प्रतिनिधी । शहरातील महापालिकेच्या सात लसीकरण केंद्रांवर उद्या शुक्रवार दि. २७ ऑगस्ट रोजी १८ प्लस नागरिकांसाठी लस उपलब्ध असणार आहे. यात ५० टक्के ऑफलाईन तर ५० टक्के ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांना लस दिली जाणार आहे.
मागील २४ तारखेपासून लस उपलब्ध नसल्याने महापालिकेचे सर्व लसीकरण केंद्र बंद होती. उद्या कोविशिल्ड लस छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहू नगर, डी. बी. जैन हॉस्पिटल, शिवाजीनगर, शाहीर अमर शेख हॉस्पिटल, कुंभारवाडा, काशीबाई उखाजी कोल्हे, जुना नशिराबाद रोड, नानीबाई अग्रवाल हॉस्पिटल, पंचमुखी हनुमान मंदिरामागे, मनपा शाळा क्र. ४८, पिंप्राळा येथे मिळणार आहे. कोवॅक्सिन लस चेतनदास मेहता हॉस्पिटल, सिंधी कॉलनी येथे उपलब्ध राहणार आहे. दरम्यान , या सर्व केंद्रांवर १८ + नागरिकांना लस उपलब्ध असणार असल्याच्ये मनपा प्रशासनाने कळविले आहे.