Home Cities जळगाव शहरातील श्रीराम विद्यालयात राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस माल्यार्पण

शहरातील श्रीराम विद्यालयात राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस माल्यार्पण


जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण मधील श्रीराम माध्यमिक विद्यालयात राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव अशोक लाडवंजारी यांच्याहस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. शहरातील मेहरूण येथील श्रीराम माध्यमिक विद्यालयात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असतात. या अनुषंगाने राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अतुल चाटे, संजय बडगुजर, दिनेश पाटील, अमित तडवी, सरस्वती ढाके, राजेश्री तायडे, संगिता कुलकर्णी, मोतीलाल पाटील यांच्या उपस्थितीत भगवान बाबा जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले.


Protected Content

Play sound