जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अनेक वर्षांपासून रस्त्यांची समस्या निर्माण झाली होती यामुळे जळगावकर चांगलेच त्रस्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या माध्यमातून जळगाव शहरातील मुख्य रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी १३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दुपारी ४ वाजता जिल्हा रुग्णालय, दूध फेडरेशन, शिवाजीनगर या परिसरात जाऊन प्रत्यक्ष रस्त्यांची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करण्यात यावे, या संदर्भात निर्देश देण्यात आले आहे.
जळगाव शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यांचा विकास झालेला नव्हता. त्यामुळे रस्त्यामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूकदारांना वाहन चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. या संदर्भात जळगाव शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले होते. तातडीने जळगाव शहरातील रस्ते दुरुस्त करण्यात यावे, असे मागणी केली होती. या अनुषंगाने राज्य शासनाकडून महापालिकेला निधी प्राप्त झाला असून गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांची कामे सुरुवात करण्यात आली आहे. या अनुषंगाने आज शुक्रवारी १३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शहरातील जिल्हा रुग्णालय परिसर, शिवाजीनगर आणि दूध फेडरेशन या परिसरात जाऊन प्रत्यक्ष रस्त्यांची पाहणी केली व संबंधित ठेकेदाराला तातडीने रस्त्यांची कामे मार्गी लावावे, अशा सूचना देण्यात आले आहे.