जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटीच्या मूळजी जेठा महाविद्यालयातील एन.सी.सी. युनिटच्या छात्रसैनिकांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान शिबीरात रक्तदान केले.
केसीई सोसायटीच्या मूळजी जेठा महाविद्यालयातील एन.सी.सी. युनिटच्या छात्रसैनिकांनी सामाजिक मोहीमेत सातत्याने सक्रीय सहभाग घेऊन महाविद्यालयच नव्हे तर समाजालाही अभिमान वाटावा असे कृत्य देशाच्या ७३व्या स्वातंत्र्य दिनी केले. छात्र सैनिकांनी आपल्या एन.सी.सी. अधिकारी लेफ्ट. डॉ.योगेश बोरसे यांच्या सह रक्तदान स्वइच्छेने रेडक्रॉस, जळगाव या शाखेत जाऊन केले. यावेळी छात्र सैनिकांनी सामाजिक दुरी, मास्क लावणे तसेच हात स्वच्छ धुवून आपली सामाजिक जबाबदारी पार पडली.
संपूर्ण जगावर कॉरोनाची सावली असताना या छात्र सैनिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजापुढे निश्चितच आदर्श ठेवलाय. याच बाबी भारताच्या सम्पृभतेचे आधार बनतात.या उपक्रमादरम्यान छात्र सैनिकांना १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालीयन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल सत्यशील बाबर, सुभेदार मेजर कोमल सिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन. भारंबे, एन.सी.सी. अधिकारी लेफ्ट. डॉ. बी. एन. केसुर आणि लेफ्ट. डॉ. योगेश बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.