यावल, प्रतिनिधी । शहरातील दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दगावल्याचा परिणाम म्हणून दुकाने व बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहावयास मिळाले. पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत चालली असून महसुल व आरोग्य आणि पोलीस प्रशासनास नागरीकांच्या आरोग्याविषयी अधिक सर्तक व दक्ष राहण्याच्या सुचना प्राप्त झाल्या आहे अशी माहिती प्रशासकीय सुत्रांकडुन प्राप्त झाली आहे.
मागील आठवडयात कोरोना या विषाणु संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव यावल तालुक्यात मोठ्या वेगाने वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यावल शहरातील मिळालेले तिन कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांमधील दोन जणांनाचा मागील चोवीस तासात मृत्यु झाला आहे. यात यावलच्या पुर्णवाद नगर मधील राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील ५७ वर्षीय महीला आणी एक तिरूपती नगरमध्ये राहणाऱ्या भाजीपाला विक्रेत्याचा समावेश आहे. तर तिसरा पॉझीटीव्ह रूग्ण हा सुर्देशन चित्र मंदीर परिसरातील एका डॉक्टरचा मुलगा असुन त्यास विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या तिघा तिघां कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांनी यावल येथील भुसावळ टी पॉईंट समोर खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलनात एका दवाखान्यात उपचारासाठी जात असल्याचे वृत्त समोर येत आहे. डॉक्टरांनी कालपासुनच आपला दवाखाना बंद केल्याचे समजते. यावल व परिसरातुन विलगीकरण कक्षात असलेल्या जवळपास ३५ जणांचे स्वॅबचे नमुने उत्तरीय तपासणीसाठी पाठवीण्यात आले असून एक दोन दिवसात त्यांचा अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत बऱ्हाटे यांनी नागरीकांना आपल्या आरोग्याच्या प्रती अती सावध राहण्याचा सल्ला दिला असुन कोवीड१९चा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी उघडयावर थुंकु नये, तुम्हाला ताप व खोकला वा यासारखी लक्षणे असल्यास इतरांशी निकटचा संपर्क ठेवु नये , प्राण्यांशी थेट संपर्क तसेच कच्चे अर्धवट शिजलेले अन्न खाणे टाळावे. कत्तलखाने व उघडयावर मांस विक्रीच्या ठीकाणी जाणे टाळावे. हे केल्यावर आपले हात स्वच्छ धुवा. खोकल्यावर अथवा शिकल्यानंतर, एखाद्या आजारी व्यक्तीची काळजी घेताना झालेला स्पर्श, महीलांनी स्वयंपाक करण्यापुर्वी आणि स्वयंपाक तयार करतांना व झाल्यावर आपले हात स्वच्छ धुवावे. जेवणापुर्वी तसेच शौचालयानंतर स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी व आपले हात वारंवार धुणे अशी खबरदारी आपल्या कोरोना लढा देण्यासाठी काळजी प्रत्येक नागरीकांने घ्यावची असल्याची शासनाव्दारे जाहीर परिपत्रकात म्हटले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत बऱ्हाटे यांनी प्रस्तुत प्रीतीनिधीशी बोलतांना दिली. दरम्यान, अचानक कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण दगावल्याने आज यावल शहरातील मेन रोड वरील बाजारपेठेतील काही अत्यावश्क सेवा वगळता जवळपास सर्व व्यवसाय व दुकाने पुर्णपणे बंद असल्याचे दिसुन आल्याचे दिसत होते. दोन दिवसात दोन कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण दगावल्याचा हा परिणाम असल्याचे जाणकारांचे मत आहे.