शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले आहेत.

महाराष्ट्रातील एकंदरीत घडामोडी बघता ही भेट महत्त्वाची आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथिगृहावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी कृषी संदर्भातील विविध मुद्यांचा आढावा घेतला. या बैठकीला राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संदीपान भुमरे उपस्थित होते. या भेटीनंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर गेले.

काँग्रेसने आता अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. काँग्रेसने स्वबळाची भूमिका घेतली आहेच पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बारामतीत ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेसने यापूर्वी अशी आक्रमक भूमिका कधीच घेतली नव्हती. त्यामुळे शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे सरकारचे चालक आहेत आणि काँग्रेस त्यांचा एक भाग आहे, असं चित्र होतं. पण काँग्रेसची भूमिका अचानक आक्रमक झाल्याने आगामी स्थानिक निवडणुका आणि सरकारचं काय? अशा अनुषंगाने चर्चा होऊ शकते, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत .

 

 

Protected Content