नाशिक (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक उद्या (सोमवार) बोलावली आहे. पवारांनी ही बैठक नेमकी कशासाठी बोलावली?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासावर शरद पवार यांनी एनआयएकडे तपास सुपूर्द करणे मुख्यमंत्र्यांच्या अधिकार असल्याचे सांगितल्यामुळे त्यांच्या बोलण्यात नाराजी असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर फक्त राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक शरद पवारांनी बोलावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह छगन भुजबळ, जयंत पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे असे राष्ट्रवादीचे सर्वच मंत्री उपस्थित राहतील.