मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादी पक्षांनी प्रशासनाकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना एकाने ट्विटर अकाऊंटच्या साहाय्याने जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार आहे. अशाप्रकारे ट्विट करण्यात आले आहे. यानंतर
ट्विट करणाऱ्या व्यक्तीला अटक करून त्याची सखोल चौकशी करावी. व यामागील मास्टर माईंड शोधण्यात यावा तसेच शरद पवार सुरक्षा वाढविण्यात यावी याचबरोबर
शरद पवार यांचा एकेरी शब्दात अपशब्द बोलून समाजात तेढ निर्माण करणारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. गोपीचंद पडळकर,आ. नितेश राणे यांनी पदाचा राजीनामा द्यावा या मागणीचे निवेदन मुक्ताईनगरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फ़े तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले.
यावेळी मुक्ताई सह सूतगिरणी अध्यक्षा रोहिणी खडसे,
जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, राजिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, बाजार समिती सभापती सुधिर तराळ, प्रवक्ता सेल संयोजक विशाल महाराज खोले, रामभाऊ पाटील, किशोर चौधरी, मधुकर गोसावी, रविंद्र दांडगे, प्रविण पाटील, बापु ससाणे, एजाज खान, बाळा भालशंकर, विकास पाटील, नंदकिशोर हिरोळे, रउफ खान, सुनिल पाटील, भावराव पाटील, सोनु पाटील, प्रविण दामोदरे, प्रदिप साळुंखे, संजय कपले, विशाल रोटे, राहुल पाटील, निलेश भालेराव, हाशम शहा, अय्याज पटेल, मुश्ताक मण्यार, जुबेर अली ,हर्षल झोपे, प्रभाकर झोपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय संरक्षण, कृषी मंत्री, माजी मुख्यमंत्री शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे दैवत आहे. आमच्या या दैवताला राजकारण महाराष्ट्राचे नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाने असलेल्या ट्विटर अकाऊंट वरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार आहे. असे ट्विट या अकाऊंटवरुन करण्यात आले आहे. देशाचे संरक्षणमंत्री राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार साहेबांच्या व्यक्तीला खुलेआमपणे जिवे मारण्याची धमकी मिळत आहे. यावरून राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. हे लक्षात येते. तरी लवकरात लवकर सदर ट्विटर अकाऊंट चालकास अटक करून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. व यामागील मास्टर माईंड शोधून काढण्यात यावा. शरद पवार साहेबांच्या सुरक्षतेत वाढ करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. तसेच
शरद पवार साहेबांना काहीही धोका पोहोचल्यास त्यास केंद्रीय आणि राज्याचे गृह खाते जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. अशा धमकी देणाऱ्या अपप्रवृत्तीचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जाहीर निषेध करतो. तसेच राज्याचे वनमंत्री ना सुधीर मुनगंटीवार, आ .गोपीचंद पडळकर, आ. नितेश राणे या संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींनी मा. शरद पवार साहेबांबद्दल एकेरी शब्दात आणि समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून आपल्या संकुचित मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे. या संकुचित मनोवृत्ती असणाऱ्या अपप्रवृत्ती च्या लोकांचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. संविधानीक पदावर असणाऱ्या या व्यक्तींनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर्फे करण्यात आली आहे.