मुंबई (वृत्तसंस्था) देशातील सर्व राज्य सरकारं ‘करोना’च्या संकटावर मात करण्यासाठी झुंजत असताना काही राज्यांत राज्यपालांकडून अधिकाऱ्यांना परस्पर आदेश दिले जात आहेत. त्यामुळं समन्वय राखण्यात अडचणी येऊ शकतात. केंद्र सरकारने याबाबत योग्य ती काळजी घ्यावी. थोडक्यात राज्यपाल भगतसिंह यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तक्रार केली आहे.
शरद पवार म्हणाले की, राज्यपातळीवर काही राज्यांमध्ये असे ऐकावयास मिळते की माननीय राज्यपालांकडून देखील थेट कार्यकारी वर्गाला सूचना निर्गमित होतात. राज्यपाल महोदयांना राज्याच्या बाबतीत सल्लामसलत करण्याचे अधिकार आहेत. ते त्यांनी जरूर वापरावेत. मात्र मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत तसे झाल्यास राज्यात दोन सत्ताकेंद्रे होणार नाहीत. तसेच समन्वयामध्ये चूक होणार नाही असे मत त्यांनी मांडले. तसेच ‘शेतकरी वर्ग व शेतीवर अवलंबून असणाऱ्या घटकांना तातडीने दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले उचलावीत. केंद्र सरकारने राज्यसरकारचे उत्पन्न कसे वाढेल वाढेल याकडे लक्ष द्यावे, असेही पवार यांनी म्हटले.