जळगाव प्रतिनिधी । शनीपेठेतील गुरूनानक नगरातील विवाहितेला ५० हजार रूपयांसाठी शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह सासरकडील सहा जणांविरोधात शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शनीपेठमधील गुरूनानक नगरातील माहेर असलेल्या श्वेता विनय पवार (वय-२५) यांचा विवाह विनय संतोष पवार रा. गुरूनानक नगर यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नानंतरचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती विनय पवार याने पत्नीला माहेरहून ५० हजार रूपये आणावे अशी मागणी केली. पैश्यांची मागणी केल्यानंतर पैसे दिले नाही म्हणून पती, सासू, चुलत सासरा, चुलता सासू, दोन नणंद यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. तर काही वेळा उपाशी ठेवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता श्वेता पवार ह्या माहेरी निघून आल्या. बुधवारी १९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती विनय संतोष पवार, सासू ज्योती संतोष पवार, चुलत सासरे सतिष कन्हैय्या पवार, चुलत सासू छाया सतिष पवार सर्व रा. गुरूनानक नगर जळगाव, नणंद भावना नितीन गोयर आणि नेहा सतिष गोयर दोन्ही रा. पुलगाव ता.जि.अमरावती या सहा जणांविरोधात शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पेालीस नाईक अर्चना भावसार करीत आहे.