Home Cities जळगाव व.वा. वाचनालयाच्या सभागृहात उत्तर महाराष्ट्र स्तरीय “महामूर्ख संमेलन”

व.वा. वाचनालयाच्या सभागृहात उत्तर महाराष्ट्र स्तरीय “महामूर्ख संमेलन”


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मराठी प्रतिष्ठानच्या वतीने होळीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी जळगाव शहरातील व. वा.वाचनालयाच्या सभागृहात उत्तर महाराष्ट्र स्तरीय महामूर्ख संमेलन पार पडले.

 

यावेळी आ. सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थिती सह नगर सेवक पृथ्वीराज सोनवणे, माजी नगरसेवक विजय वाणी इत्यादी ची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आ सुरेश भोळे याना वांग्याची माळ पायातून घालून आणि मूर्ख भूषण ही पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला याच बरोबर गाढवाच्या प्रतिमेचे नारळाच्या सालीची माळ घालून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

 

या संमेलनात करमणूक म्हणून करण्यात आलेल्या थापा मारण्याची स्पर्धा, फिशपाँड सह व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांना कांद्या बटाट्याच्या माला घालून आणि मूर्ख नरेश, मूर्ख सम्राट, मूर्ख शिरोमणी सारख्या पदव्या देऊन सन्मानित करण्यात आल्याने हे मूर्ख संमेलमुळे उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

 

उपस्थित हास्य कवींनी हास्य कविता सादर केल्या, थापा मारणे स्पर्धा घेण्यात आली, यामध्ये विजेत्याला मूर्ख नरेश पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. मी केलेला मूर्खपणा या विषयावर मनोगत व्यक्त करण्यात आली. यावेळी हास्य कवींनी सध्याच्या राजकारणावर आणि विकासाच्या प्रश्नावर मार्मिक अशा हास्य कविता सादर करून उपस्थित रसिकांची चांगलीच करमणूक केल्याचा यावेळी पाहायला मिळाले.


Protected Content

Play sound