जळगाव : प्रतिनिधी । लैगिंक संबंधाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून पत्नीसोबत पतीने अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आरोपी पतीविरूध्द शुक्रवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील एका गावातील २९ वर्षीय तरूणीचा २३ फेब्रुवारी २०२१ रोजी जळगावातील अनिल (नाव बदललेले) यांच्याशी विवाह झाला. लग्नाच्या तिसऱ्या दिवसांपासून अनिलने पत्नीशी केलेले लैंगिक संबंधाचे व्हिडीओ नकळत काढले. नंतर पत्नीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून पत्नीला पतीने अनैसर्गिंक कृत्य करण्यास भाग पाडले, हा प्रकार दीड महिन्यांपासून सुरू होता . हा अत्याचार विवाहितेला असहाय्य झाल्याने विवाहिता ३ एप्रिल रोजी माहेरी निघून आल्या. विवाहितेने हा प्रकार आईवडीलांना सांगितला. आईवडीलांनी मुलीला धीर देत थेट शहर पोलीस ठाणे गाठले. विवाहितेच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.