मुंबई प्रतिनिधी । राज्यातील वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका पत्रातून केली आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. यात म्हटले आहे की, प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या राज्यातील वैधानिक विकास मंडळांची मुदत ३० एप्रिल २०२० रोजी संपते आहे. प्रादेशिक असमोल दूर करण्याबाबत या मंडळांची भूमिका आणि मदत आत्तापर्यंत अतिशय महत्त्वाची राहिली आहे हे आपण जाणताच. असं असलं तरीही अद्यापही प्रादेशिक असमोतल दूर करण्यात १०० टक्के यश आपण गाठू शकलो नाही. यामुळे नियोजनात्मक पातळीवर अतिशय महत्त्वाची भूमिका असलेल्या या मंडळांना मुदतवाढ देणं आवश्यक आहे. तशी कारवाई आपण लगेच करावी अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००