मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील शिवसेना पक्षावरील वर्चस्वाच्या वादाचा निकाल हा वेळेवरच लागणार आहे.
उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सत्ता संघर्षाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयामध्ये पाच याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलत २२ ऑगस्टला सुनावणी ठेवली आहे. यावरील सुनावणी आधी घ्यावी अशी मागणी शिवसेनेने केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला कागदपत्र सादर कऱण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे याचिका लिस्ट करण्याची शिवसेनेनं मागणी केली.
यावर सुप्रीम कोर्टाने आज आपण अजून कुठलाही निर्णय आम्ही दिला नाही, असं म्हणत सुनावणी घेण्यास नकार दिला. शिवसेनेवरील दाव्याप्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाने केली. पण सुप्रीम कोर्टाने सांगितले की, सुनावणी आपल्या वेळेवर होईल.