जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील संभाजी नगरात वृध्द महिलेचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोकड असा एकुण ५८ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवार ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सरला भगवान भामरे (वय-६७) रा. संभाजी नगर, जळगाव या वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १९ जुन सायंकाळी ६ वाजता ते शुक्रवारी ४ ऑगस्ट सकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांचे संभाजी नगरातील घर बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून सोन्याचे, चांदीचे दागिने आणि रोकड असा एकुण ५८ हजारांचा मुद्देमाल लांबविला. वृध्द महिला घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी ४ वाजता सायंकाळी ७ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे करीत आहे.