वृध्दाच्या हातीतील नोटांचे बंडल लांबविण्याऱ्याला रंगेहात पकडले !

 

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील बँक ऑफ बडोदा शाखेत वृद्धाच्या हातातील ५० हजार रुपयांचे बंडल जबरी हिसकावून पळणाऱ्या संशयित आरोपीला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, दिलीप ताराचंद पाटील (वय-६६, रा. शिवदर्शन नगर, चाळीसगाव) हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. सध्या ते पाचोरा तालुक्यातील सारवे येथे वास्तव्याला आहे. दरम्यान ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता चाळीसगाव शहरातील बँक ऑफ बडोदा या शाखेत कामाच्या निमित्ताने पैसे काढण्यासाठी आले होते. बँक खात्यातून त्यांनी १ लाख रुपयांची रोकड काढली आणि बँकेत बाकड्यावर बसून ५०० रुपयांचे बंडल मोजत असताना त्याच्या शेजारी बसलेला रफिक हुसेन जाफरी व त्याच्या साथीदार याने हातातील ५० रुपयाची बंडल हिसकावली व पळ काढला. तोपर्यंत दिलीप पाटील यांनी आरडा ओरड केली असता येथील नागरिकांनी त्यांना पकडले. दरम्यान संशयित आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून दिलीप पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टाकले करीत आहे.

Protected Content