जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीन बसस्थानक जवळील शहरी बेघर निवारा केंद्रात ८० वर्षीय वृध्दाचे अकस्मात मृत्यू झाला होता. वृध्दाचे नातेवाईक कुणीही नसल्याने गावातील अपंग बांधवाच्या पुढाकार घेवून नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
जळगाव शहर महापालिकात अंतर्गत नवीन बसस्थानक जवळील संत गाडगेबाबा शहर बेघर निवारा केंद्र येथे राहत असलेले सुपडू घुमा वाघ (वय-८०) यांचे वृध्दपकाळाने सोमवारी १५ ऑगस्ट रोजी अकस्मात त्यांची तब्बेत बिघडली होती. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलीसांनी पंचनामा केल्यानंतर मयत वृध्दाचे कुणीही नातेवाईक नसल्यामुळे जय सदगुरू वस्तीस्तर संघाचे अध्यक्ष गणेश पाटील यांनी पुढाकार घेवून मयत झालेल्या वृध्दास नेरी नाका स्माशानभूमीत अग्निडाग देवून अंत्यसंस्कार केले. याप्रसंगी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिरोजी तडवी, संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, काळजीवाहक राजेंद्र मराठे, दीपक चौधरी, शितल काटे, आशा पाटील, भारती पाटील, रवींद्र शिंदे, जितेंद्र पाटील, जयकिसन भोवते, भीमराव सपकाळे उपस्थित होते.