वर्धा (वृत्तसंस्था) एका वृद्ध महिलेसह तिच्या मुलाची काही जणांनी धारदार शस्त्राने हत्या करत मृतदेह शेताच्या बांधावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना देवळी तालुक्यातील निमगव्हाण येथे घडली आहे.
बाभूळगाव येथील सचिन बोबडे याने १९ मार्चला रात्रीच्या सुमारास साथीदारांच्या मदतीने सुरेंद्र नीलकंठ राऊत (३०) व आई जनाबाई नीलकंठ राऊत (६५) याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. दोघांचीही हत्या करत मृतदेह शेताच्या बांधावर फेकून देत सचिनने यवतमाळकडे पळ काढला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने २४ तासांच्या आत हत्येतील आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली.